विद्युत विभागाला आंदोलनाचा इशारा देताच 3 दिवसापासून बंद असलेली कृषिपंपाची विद्युत सुरू ( गेवर्धा फिडर )

73

विद्युत विभागाला आंदोलनाचा इशारा देताच 3 दिवसापासून बंद असलेली कृषिपंपाची विद्युत सुरू ( गेवर्धा फिडर )

कुरखेडा :- तालुक्यातील गेवर्धा फिडर मधील शेतीच्या पंपाचे सप्टेंबर महिन्याचे विद्युत बिल भरले नाही म्हणुन दोन डीपी चे विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद करण्यात आला होता। दुबार फसला च्या ऐन रोवणीच्या वेळेवर विद्युत पुरवठा बंद झाल्याने शेतकरी चिंतेत होते,मग या विद्युत पुरवठा बंद ची तक्रार आज दिनांक 19 फेब्रुवारी ला शेकडो शेतकऱ्यांनी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांना केली,लगेच सुरेंद्रसिंग चंदेल यांनी सहाय्यक अभियंता मुरकुटे यांचेशी कृषी पंपाचे विद्युत पुरवठा जोडणी विषयी विनंती केली,परंतु बिल भरल्याशिवाय पुरवठा सुरू करता येणार नाही असे भूमिका सहायक अभियंता यांनी घेतली,मग वरिष्ठ विद्युत अधिकाऱयांना तीव्र आंदोलनाचा इशारा माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांनी दिला,त्यानंतर सहायक अभियंता मुरकुटे यांचेशी पुनश्च चर्चा झाली,त्या चर्चेत बंद केलेला विद्युत पुरवठा सुरू करतो परंतु जे चालु महिन्याचे बिल आहे ते शेतकरयांनी भरावे त्यांना मुदत देण्यात येईल असे सांगीतले व विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला। या प्रसंगी कुरखेडाचे माजी नगराध्यक्ष
महेंद्र मोहबन्सी,तक्रार कर्ते शेतकरी राकेश खुणे ग्रामपंचायत सदस्य देऊळगाव, गुणाजी कवाडकर,सेवादास पाटील खुणे व शेकडो शेतकरी हजर होते।