नाकर्त्या सरकारच्या विरोधात 24 ला जेलभरो आंदोलन
आंदोलनात सहभागी होण्याचे खासदार अशोक नेते यांचे आवाहन
अहेरी :- दि .20/2
महाराष्ट्र तील महा आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा व निष्काळजीपणा मुळे सर्व सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने अहेरी विधानसभा क्षेत्रात 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बिले पाठवून त्यांच्या परिस्थितीशी खेळणाऱ्या संरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसतांना महागाई वाढवून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या नाकर्ते सरकारला जागे करून त्यांना धडा शिकविण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. आलापल्ली विश्रामगृहात आयोजित अहेरी विधानसभा क्षेत्राच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीप कोरेत, भाजपचे जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते दामोदरजी अरगेला, अहेरी तालुकाध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, तालुका महामंत्री मद्दीवार, तालुका महामंत्री पोशालु चुधरी, एटापल्लीचे भाजयुमोचे निखील गादेवार, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.