रुई येथील हेमांडपंथी हनुमान मंदिर देवस्थान बांधकामाचे उदघाटन
ब्रम्हपुरी :- दि. 21 फेब्रुवारी
हेमांडपंथी हनुमान मंदिर देवस्थान रुई / बेलपातळी च्या नवीन मंदिर बांधकामाचे उदघाटन आज भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या शुभ हस्ते भाजपचे जिल्हाअध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार अतुलभाऊ देशकर, जिल्हा संघटन महामंत्री तथा जिप सदस्य संजयजी गजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंस सभापती रामलालजी डोनाडकर, उपसभापती सुनीताताई ठवकर, जिप सदस्य प्रमोद चिमुरकर, रुई च्या सरपंच कल्पनाताई तूपट, नगरसेवक मनोज वठे, डॉ बालपांडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.