तेलंगणा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सुरू केली कडक तपासणी मोहीम

142

तेलंगणा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सुरू केली कडक तपासणी मोहीम

अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी तेलंगणा पोलिसांची प्रयत्न

सिरोंचा :- सिरोंचा पासून ३ किमी अंतरावर असलेल्या प्राणहिता पुलाच्या निर्मिती झाल्यापासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे,, आणि राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या वर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी काल पासून कडक तपासणी मोहीमाला सुरुवात केली आहे
तेलंगणात येथील कोटापल्ली पोलीस निरीक्षक नागराज यांचा मार्गदर्शनात राष्ट्रीय महामार्ग 63 वर मंचिरॉल जिल्हा कोटापल्ली मंडल पारपल्ली येथे व प्राणहिता पुला च्या 3 किमी अंतरावर तेलंगणा हद्दीत लक्षीमिपुर येथे वाहन तपासणी काल पासून जोमात सुरू केली आहे ..
अपघात रोखण्यासाठी मद्यपान व वाहन चालवून योग्य कागदपत्रे नसलेल्यांवर दंड आकारण्यात येत आहे …
हेल्मेट घालण्याचा सल्ला या वेळी देण्यात येत आहे…
सिरोंचा येथील युवकांच्या २० फेब्रुवारी रोजी प्राणहिता पुला पासून 100 मीटर अंतरावर तेलंगणा हद्दीत दोन दुचाकी समोरासमोर धडक देऊन गंभीर अपघात लोकांचा डोळ्यासमोर आहे या अपघातात 3 तरुणांनी आपल्या जीव गमवावा लागला आहे या घटना मुळे सिरोंचा तालुक्यातील वाहन चालकांमध्ये धस्ती निर्माण झाली असून या पूर्वी सुद्धा असे अनेक अपघात झाले आहे या साठी पोलिसांनी तपासणी रोज केलं तर नक्कीच नियंत्रण होऊ शकतो म्हणून काल पासून सुरू केलेल्या तपासणी आम्ही कायम ठेवणार आहे आणि वाहन परवाना हेल्मेट सक्ती केली आहे आणि मद्यपान करून वाहन चालवण्याऱ्यांवर कारवाही केला जाणार आहे असे कोटापल्ली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नागराज यांनी या वेळी सांगितले,,,,,