गडचिरोली -चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील तुटलेल्या पाईपलाईन ची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी

82

गडचिरोली -चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील तुटलेल्या पाईपलाईन ची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी

तात्काळ दुरुस्ती करण्याचे दिले निर्देश

गडचिरोली :- 23/2
गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता बांधकाम दरम्यान पाईपलाईन तुटल्याने गेल्या 15 दिवसापासून चामोर्शी मार्गलगतच्या वार्डातील नळ पाणी पुरवठा बंद आहे परिणामी नागरिकांना पाण्याची टंचाई भासत असून नागरिकांमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषद प्रशासना विरुद्ध रोष व्यक्त होत आहे.

आज दि 23 फेब्रुवारी रोजी खासदार अशोक नेते यांनी स्वतः जाऊन चामोर्शी मार्गावरील नळ पाईपलाईन ची पाहणी केली व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सर्व अधिकारी व नगर प्रशासनाला त्याठिकाणी बोलावून सदर पाईपलाईन ची त्वरित दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले व उद्या दुपार पर्यंत पाईपलाईन ची दुरुस्ती न केल्यास तात्पुरती व्यवस्था करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ही यावेळी खासदार अशोक नेते यांनी संबंधीत अधिकारी व नगर प्रशासनाला दिले.

या बाबींची गंभीर दखल घेत खासदार अशोक नेते यांनी उद्या दि 24 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता संबंधित सर्व अधिकारी व नगर परिषद च्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या जनसंपर्क कार्यालयात बोलाविली असून या कामाबाबतची व कामाच्या योग्य दर्जा बाबतची माहिती ते घेणार आहेत व कामात हयगय करणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते जॉब विचारणार आहेत व दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.