यवतमाळ जिल्ह्यात 246 जण पॉझेटिव्ह, 158 जण कोरोनामुक्त

125

जिल्ह्यात 246 जण पॉझेटिव्ह, 158 जण कोरोनामुक्त

Ø दोघांचा मृत्यु

 यवतमाळ, दि. 23 :
गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 158 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील  83 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 246 जणांमध्ये 154 पुरुष आणि 92 महिला आहेत. यात यवतमाळातील 132 रुग्ण, दिग्रस 39, पुसद येथील 25, दारव्हा 17, पांढरकवडा 17, नेर 5, वणी 4, आर्णि 3, बाभुळगाव 3 आणि महागाव येथील 1 रुग्ण आहे.

सोमवारी एकूण 1339 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1093 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1138 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16501 झाली आहे. 24 तासात 158 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14913 आहे. तर जिल्ह्यात एकूण 450 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 155044 नमुने पाठविले असून यापैकी 154308 प्राप्त तर 736 अप्राप्त आहेत. तसेच 137807 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००००