गडचिरोली शहरात धोबी समाजाच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

137

गडचिरोली शहरात धोबी समाजाच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
गडचिरोली-
आज दि.२३ फेब्रुवारी रोजी
संत गाडगेबाबा यांची
स्थानिक इंदिरा गांधी चौकात जयंती साजरी करण्यात आली.
मा.विजयभाऊ गोरडवार माजी सभापती नगरपरीषद गडचिरोली तथा वरीष्ठ प्रदेश उपाध्यक्ष धोबी समाज संघटना.यांचे हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन, माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मा.प्रा.डाॅ प्रफुल्ल नांदे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा.विनोद कोल्हटवार अभियंता विज वितरण कार्यालय गडचिरोली,
धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष आकणुरवार, जिल्हाकार्याध्यक्ष निशांत पापडकर
, जिल्हा सचिव मोरेश्वर मानपल्लीवार ,
सुभाष रोहनकर,पि जी राहुलवार
युवा जिल्हाध्यक्ष
प्रभाकर रोहनकर,युवा जिल्हा सचिव भास्कर मेडपल्लीवार, युवा कार्याध्यक्ष प्रविण ताजने, दत्तु केळझरकर,विलास केळझरकर, बंडु क्षिरसागर, अरुण केळझरकर गुरूजी,युवाशहरअध्यक्ष महेश कोतकोंडावार ,शंकर बारसागडे, महीला जिल्हाध्यक्षा शिल्पा कोल्हटवार, जिल्हा महिला मार्गदर्शिका लताताई वरघंटे, मंगलाताई केळझरकर, जिल्हा महिला सचिव कल्पना चतुरकर, महीला शहर अध्यक्षा निलीमा दासरवार, वैशाली ताजने, सुनंदा गोरडवार,आदी मान्यवरांनी उपस्थितीत राहुन संत गाडगेबाबांना अभिवादन केले. व
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु कंठीवार,अशोक कोल्हटवार, नेताजी कावळे, अमोल कोतकोंडावार, नितीश केळझरकर,संजय यंम्पल्लीवार, विकास तरमनवार, रमेश गडपायले, अरविंद मादेश्वार,मयुर दासरवार आदिंनी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.सदर कार्यक्रम हे अभिनव लाॅन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते मात्र कोरोना या साथरोगाच्या वाढत्या प्रभावामुळे मा जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांच्या द्वारे कोरोना प्रतिबंधक म्हणुन निघालेल्या परीपत्रकाचे पालन करुण.
मास, सामाजिक अंतर,तथा सॅनिटाईझर या सर्वांचा उपयोग करून थोडक्यात कार्यक्रम घेण्यात आले त्यामुळे बहुसंख्य समाज बांधव तथा भगिनींना या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. करीता त्या बद्दल नाराजी न बाळगता समाज संघटनेला सहकार्य करावे करीता आयोजका तर्फे विनंती करण्यात येत आहे.