सिद्धबली इस्पात लिमी च्या मालकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री

111

सिद्धबली इस्पात लिमी च्या मालकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट

मृत कामगाराचे पार्थिव शरीराची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्याचा डाव सिद्धबली इस्पात च्या मालकांना भोवणार

चंद्रपूर :- सिद्धबली इस्पात लिमी येथील झालेल्या कामगाराच्या मृत्यूची गांभीर्याने चौकशी व्हावी व सदर कामगाराचे पार्थिव शरीराची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी उद्योग मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रभावी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अरविंद साळवे यांची भेट घेत केली.
या भेटीप्रसंगी हंसराज अहीर यांच्यासोबत भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अंजली घोटेकर, भाजपा महानगर महामंत्री रवि गुरनले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपुर ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात येथे मध्यप्रदेश निवासी शैलेन्द्र नामदेव नामक कामगाराचा मृत्यु झाला. मात्र सदर गंभीर प्रकरणात उद्योग संचालक व व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी बनवाबनवी करीत पोलीस विभागाची दिशाभूल की व या गंभीर प्रकरणात क्षेत्राच्या पोलीस अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला याची सखोल चौकशी करण्याची मागणीयावेळी हंसराज अहीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली.
या प्रकरणात उद्योग व्यवस्थापनाने अपघात झाल्यानंतर सदर कामगार हा जखमी झाला असल्यांचे सांगितले मात्र हा कामगार जर जखमी होता तर त्याला लगेच उद्योग व्यवस्थापना च्या माध्यमातून चंद्रपूर ला वैद्यकीय सेवा का देण्यात आल्या नाही अथवा जर का हा कामगार जागीच मृत्युमुखी पडला त्याच वेळीच पोलीस पंचनामा का झाला नाही, या कामगारासाठी ऍम्बुलन्स अथवा वैद्यकीय सेवा उपलब्ध असलेल्या वाहनात का पाठविण्यात आले नाही हे सर्व प्रश्न समोर उभे झाल्याने याची गांभीर्याने चौकशी होऊन या अक्षम्य व अमानवीय कृत्याबद्दल उद्योग मालकावर गुन्हा नोंदवावा अशी प्रखर मागणी यावेळी हंसराज अहीर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.