एटापल्ली तालुक्यातील कोकोटी जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला.

252

एटापल्ली तालुक्यातील कोकोटी जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला.
10 किलोग्रामचे 2 बॉम्ब केले नष्ट
एटापल्ली-
23 फेब्रुवारीला एटापल्ली उपविभागाअंतर्गत कोटमी पोलीस मदत केंद्रा अंतर्गत येत असलेल्या कोकोटी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान पथक व विशेष कृती दल कोटमी मदत केंद्राचे जवान यांनी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सकाळी साडे नऊ च्या सुमारास कोकोटी गावच्या उत्तरेला असलेल्या जंगल परिसरातील पहाडी भागात नक्षलवाद्यांनी कॅम्प लावल्याचे संशयास्पद हालचाल दिसून आल्याने पोलीस जवान नक्षलवाद्यांच्या दिशेने आगेकूच केली.तेवढ्यात स्वयंपाकाची तयारी करण्यात व्यस्त असलेल्या नक्षल्यांनी मोठ्या प्रमाणावर असलेल्या जीवनावश्यक साहित्यसोडून घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळ काढला.
जवानांनी सदर परिसरात शोध अभियान राबविले असता पहाडीच्या पूर्व दिशेला 1 व पश्चिम दिशेला 1 इलेक्ट्रॉनिक वायर दिसून आला.तसेच बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केली असता नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने 10 किलोग्रामचे 2 ब्लास्ट पुरून ठेवले असल्याचे आढळून आले.नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला बॉम्ब जमिनीबाहेर काढणे धोक्याचे असल्याने बॉम्ब शोधक पथकाकडून जागेवरच नष्ट करण्यात आले.

पोलिसांनी या भागात सक्रीय असणाऱ्या कंपनी क्र.4 चा प्लाटून नक्षली कमांडर प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकाल वीर उर्फ पदकाला स्वामी उर्फ लोकेटी चंदरराव तसेच कसनसुर दलम डीव्हीसीएएम त्याच्या सहकारी नक्षल्यांवर कलम 307,143,147,148,149,120 ब नुसार गुन्हा रेगडी पोलीस मदत केंद्रात फिर्याद नोंदविण्यात आली.

ही शोधमोहीम पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली. नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्याची शौर्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.