गडचिरोली जिल्ह्यात आज 9 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

151

आज 9 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.24 :- आज जिल्हयात 9 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9482 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9307 वर पोहचली. तसेच सद्या 70 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.74 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 9 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 5 जणाचा समावेश आहे. तर कुरखेडा तालुक्यातील 02,आरमोरी तालुक्यातील 01, एट्टापल्ली तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 9 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 8 , वडसा 1, जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सोनापूर 1, नेहरु वार्ड 1, सर्वेादय वार्ड 1 दुर्गा मंदीर जुनी नगरपरिषद जवळ 1,कोटगल 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक 2, एट्टापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये 1 ,आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक 1, बाधिताचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील 0, बाधिताचा समावेश आहे.