*शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प*

20

*शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प*

 

राज्य सरकारच्या विद्यमान कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारा आहे. विशेषत: शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना दिड हजार रुपये महिना देऊन महिलांचा मोठा सन्मान केला आहे. याशिवाय मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा ठरणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून युवा वर्गात कौशल्य विकासाला चालना मिळून त्यांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराचा मार्ग अधिक प्रशस्त होईल. त्यामुळे अशा सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो.

 

– अशोक नेते, मा.खासदार, गडचिरोली-चिमूर तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा