गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

27

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

 

 

 

* बुद्धीबळ स्पर्धेकरिता विविध जिल्ह्रातून 450 प्रज्ञावंत बुद्धीबळपटुंनी केली नोंदणी

 

 

गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट¬ा अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. विविध खेळांच्या स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत व अधिराज वेलफेअर फाउंडेशन, रोशन सर चेस अॅकॅडमी गडचिरोली, अप्पलवार आय हॉस्पिटल गडचिरोली व गडचिरोली जिल्हा अॅमॅच्युअर चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक 30/06/2024 रोजी “अधिराज बुद्धीबळ चषक” एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील पांडू आलाम सभागृहामध्ये करण्यात आले आहे.

 

या एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्रातून 450 प्रज्ञावंत बुद्धीबळपटुंनी आपला सहभाग नोंदविला असून सदरची स्पर्धा ही चार वेगवेगळ्या वयोगटात आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 1) खुला वर्ग, 2) 15 वयोगटाच्या आतील, 3) 10 वयोगटाच्या आतील व 4) 08 वयोगटाच्या आतील यांचा समावेश असणार आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील स्पर्धकांकरिता उपरोक्त गटनिहाय स्पर्धा असणार आहे.

 

सदर बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश, अप्पलवार आय हॉस्पिटल गडचिरोली येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार, रोशन सर अॅकॅडमी गडचिरोली येथील स्पर्धा आयोजक श्री. रोशन सहारे, आंतरराष्ट्रीय आरबिट्रेटर (मुख्य परिक्षक) श्री. प्रविण पानतावणे व दिपक चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

 

।।।।।।।।।।।