गडचिरोली नगर परिषद प्रलंबित कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाका आमदार डॉ देवरावजी होळी

87

गडचिरोली नगर परिषद प्रलंबित कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाका
आमदार डॉ देवरावजी होळी

आमदारांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली नगर परिषदेची आढावा बैठक संपन्न

नगर परिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे दिले निर्देश

दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ गडचिरोली

गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील मागील ३वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची विकास कामे कंत्राटदारांच्या अडेलतट्टू धोरणामुळे प्रलंबित राहिली असून त्याचा सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे काम पूर्ण न करणाऱ्या व कार्यारंभ आदेश होवूनही काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील ७ दिवसात काम सुरू करण्याचे निर्देश द्यावे अन्यथा त्यांना काळया यादीत नाव टाकून पुढील कोणतेही काम मिळणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश आमदार डॉ देवराव जी होळी यांनी गडचिरोली नगर परिषदेच्या आढावा बैठकित दिले. बैठकीला नगराध्यक्षा सौ योगिता ताई पिपरे, नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, न प उपाध्यक्ष अनीलजी कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वरजी काटवे,सभापती प्रशांत जी खोब्रागडे, सभापती वर्षाताईनैताम,लताताई लाटकर, मुख्याधिकारी संजयजी ओव्हाळ, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, यांचेसह विवीध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. परंतु अजून पर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होवू शकले नाहीत याबाबत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत मल निसारणाच्या कामासाठी भूमिगत गटारे बांधकामासाठी १०० कोटींहून अधिक रुपयाचा निधी मंजूर करून दिला त्यातून गडचिरोली शहरात 87 किलोमीटर मंजूर गटार लाईन पैकी 60 किलोमीटर चे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित अतिक्रमणमुळे गटार लाईन चे काम थांबलेले आहे. गडचिरोलीतील गटार लाईन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी पुढील १५ दिवसात अतिक्रमण तातडीने काढण्याची प्रक्रिया पुर्ण करावी असे निर्देश दिले.
वैशिष्टपूर्ण विशेष निधी ठोक तरतूद अंतर्गत २०१७-१८ मध्ये २० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. कामांची प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश होवून २ वर्ष झालीत परंतु कंत्राटदारांच्या उदासीनतेमुळे कामे होऊ शकली नाही अनेक कामे रस्ते खोदकाम करून ठेवण्यात आली परंतु पूर्ण केली नाही. त्यामुळे अशा कंत्राटदारांना काळया यादीत टाकावे असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी दिले.
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष निधी ठोक तरतुदी अंतर्गत प्राप्त झालेल्या ३५ कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून केवळ ८ कोटी रुपये खर्च झाले असून खर्चाची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने नाराजी व्यक्त केली. स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत 1 कोटी 79 लक्ष रुपये 2017-18 अंतर्गत मंजूर असून आतापर्यंत केवळ ७६ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. १३वित्तआयोगअंतर्गत पूर्ण 19 लक्ष रुपये( शंभर टक्के निधी) खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले.नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना अंतर्गत 2017 -18 2019 -20 या कालावधीत ९ कोटी रुपये प्राप्त झाला असून केवळ १ कोटी ६१ लक्ष रुपये खर्च करण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले.तर 2020 -21 अंतर्गत 6 कोटी 55 लक्ष रुपयाची कामे मंजूर असून सदर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोटी ९ कोटी ५५ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला असून केवळ ४ कोटी ५९ लक्ष रुपयांची कामे करण्यात आल्याने उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी निर्देश दिले.सर्वसाधारण रस्ता निधी योजनेअंतर्गत 2017 ते 2019 20 या कालावधीत १कोटी ५०लक्ष रुपयांची कामे मंजूर असून ८८लक्ष रुपयांची कामे करण्यात आली. नगरोथान अभियान अंतर्गत 2017 ते 2019 20 या कालावधीत ११कोटी ६६ लक्ष रुपयांची कामे मंजूर असून केवळ ३कोटी ३१लक्ष रुपयांची कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आमदार डॉक्टर देवरावजी यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारांना पुढील सात दिवसाचे आत काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत व काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकून पुढील कोणतेही काम मिळणार नाही याची सुद्धा दक्षता नगर परिषदेने घ्यावी असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांना आढावा बैठकीत दिले.