*निवडणुका जवळ आल्याने घोषणाचा पाऊस*– महेंद्र ब्राह्मणवाडे

35

*निवडणुका जवळ आल्याने घोषणाचा पाऊस*– महेंद्र ब्राह्मणवाडे

 

गडचिरोली :: राज्य सरकारने अंतरीम बजेट सादर केला, हा बजेट पूर्णतः आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेवून सादर करण्यात आलेले बजेट असून, लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून वाचण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून सरकारने केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे, ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्ता झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हेच ऊर्जामंत्री असताना देखील गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजही शेतीच्या विजेसाठी आंदोलन करावे लागते, त्यांच्या कृषीपंपाना मीटर मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. बजेटच्या माध्यमातून गडचिरोली सारख्या जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्याकरीता प्रत्यन होतील असे वाटले होते मात्र, कोणत्याही प्रकारची भरीव निधी गडचिरोली जिल्ह्याला न दिल्याने, जिल्ह्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा काम करण्यात आला आहे.

निवडणुका जवळ आल्या की गॅस पेट्रोल चे दर कमी करायचे आणि निवडणुका झाल्या की दर परत वाढवायचं या सर्व बाबींचा महाराष्ट्र आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला जान आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूककीप्रमाणे विधानसभे मध्ये सुद्धा या सरकारला जनता धढा शिकवेल.