*निराधार मृतकाच्या अंत्यसंस्कारासाठी मूलकला फॉउडेंशनकडून मदत* 

40

*निराधार मृतकाच्या अंत्यसंस्कारासाठी मूलकला फॉउडेंशनकडून मदत*

 

 

*सिरोंचा* – येथील ग्रामीण रुग्णलयात गेल्या १० दिवसांपूर्वी अंकुलू जोडे नावाचं निराधार रुग्ण रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत होते.

दहा दिवसानंतर उपचार घेत असतांना अंकुलू जोडे यांचे तब्येत बिघडून मृत्यू झाला होता.

मृतक अज्ञात व निराधार असल्याने त्याचे कुटुंबातील कोणीही नसल्याने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या मृत्यूची माहिती सिरोंचा पोलिस ठाण्यात देण्यात आली.

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी तालुक्यात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे मूलकला फाउंडेशनचे प्रमुख सागर मुलकला यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्याने सागर मुलकला यांनी मृतकाचे नातेवाईकाना भेटून मृतदेह स्वगवी नेण्यासाठी व अंत्यसंस्कारासाठी मदत केली. सिरोंचा पोलिसांनीही आवश्यक सहकार्य केले.

मृतकाचे मृतदेह नेण्यासाठी नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी नगर पंचायतीची स्वर्गरथ उपलब्ध करून दिली.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते राजकुमार मूलकला, गणेश संड्रा, आणि मृतकांचे नातेवाईक उपस्थित होते.