*मान.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा मन की बात -१११ व्या भागाच्या प्रक्षेपणाचे आयोजन करून पाहतांना मा.खा.अशोक नेते*

14

*मान.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचा मन की बात -१११ व्या भागाच्या प्रक्षेपणाचे आयोजन करून पाहतांना मा.खा.अशोक नेते*

(गडचिरोली:)

३० जून २०२४

 

गडचिरोली:-देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आज दि.३० जून २०२४ रोज रविवार ला *मन की बात* १११ व्या भागाचे कार्यक्रम प्रभाग क्रमांक-५ बुथ क्रमांक -९८ शाहूनगर गडचिरोली येथे मा. खा.श्री. अशोकजी नेते यांच्या निवास स्थान जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकारी प्रमुखांसह व कार्यकर्ता सोबत मन की बात कार्यक्रम पाहण्यात आला.

 

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मन कि बात मध्ये बोलतांना जुलै महिनापासून पावसाचे दिवस चालू असतात या पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी याबरोबरच पहाडी एरिया व नदी नाले यात खबरदारी बाळगावी.एक पेड़ माँ के नाम अंतर्गत पर्यावरण संरक्षणाकरिता सर्वांनी वृक्षारोपण करावे.असे आव्हान करत जलसंवर्धन व जल संरक्षण करणे सुद्धा जरूरी आहे. तंदुरुस्त व उत्साही जीवन जगण्यासाठी जगात सर्वत्र ठिकाणी योग दिन साजरा केल्याबद्दल आभार मानले.ह्या मन की बात मधील गोष्टी पटलावर आणल्या.

 

 

यावेळी सोबत प्रेक्षपण पाहतांना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते. यांच्या सह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चा च्या जिल्हाअध्यक्षा गिताताई हिंगे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटने चे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, कामगार मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, भाजपा नेते श्याम वाढई,विद्यान बैदय, तसेच मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.