महान संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आधारविश्व फाउंडेशन तर्फे कठानी नदीची स्वच्छता मोहीम

107

महान संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आधारविश्व फाउंडेशन तर्फे कठानी नदीची स्वच्छता मोहीम

गडचिरोली:- महाराष्ट्राच्या पुण्य भूमितील महान संत, कीर्तनकार, ग्रामस्वच्छतेचे पुरस्कर्ते कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्य दि.23-2-2020 रोज मंगळवारी सकाळी 5-30 वाजता आधारविश्व फाऊंडेशन तर्फे कठाणी नदीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अखंड सेवाव्रत अंगिकारलेले संत गाडगेबाबा स्वच्छतेचा मूलमंत्र देत गावोगावी फिरत असत. सार्वजनिक स्वच्छता आणी अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले. आजच्या काळातही त्यांनी दिलेली शिकवण अंगिकारण्याची अत्यंत गरज आहे.आणी म्हणूनच आज त्यांच्या जयंती निमित्य आधारविश्व फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांनी कठाणी नदीचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली.आपल्या घरासोबतच आजूबाजूचा परिसर, नदी, नाले, ह्यांची सुद्धा स्वच्छता राखणे आपले कर्तव्य आहे.नदीचा परिसर स्वच्छ करताना नदीच्या पात्रात प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, खर्रा खाऊन फेकलेले प्लास्टिक, प्लास्टिक ग्लासेस सर्वत्र फेकलेले दिसून आले. प्लास्टिक चे विघटन नैसर्गिक रित्या वर्षानुवर्षे होत नाही. नदी, नाले स्वच्छ शुद्ध राहण्याकरता त्यातील पाणी साचून न राहता प्रवाही रहाणे महत्वाचे असते परंतु यालाच प्लास्टिक चा कचरा आडकाठी करतो.या वर्षी सुद्धा निर्माल्य,मृतासोबत आणलेले साहित्य तसेच डायफर सुद्धा फेकलेले दिसत होते.यावर्षी तर एक पाऊल पुढेच गेलेले होते. चक्क मृतात्म्याची गादी व आईवडिलांचे फोटो सुद्धा पुलाच्या खाली मांडले दिसले. आज मुलांना आईवडिलांची अडचण व्हायला लागली म्हणून वृद्धाश्रमात पाठवणे सुरु आहे आता तर त्यांचे फोटो सुद्धा घरात ठेवणे अडगळ वाटू लागले आहे ही शोकांतिका आहे.किव करावीशी वाटते अशा मुलांची. प्लास्टिक वर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्हच आहे परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. गडचिरोलीतील जनतेला आधारविश्व फाऊंडेशन कडून कळकळीची विनंती की कमीत कमी नदीचे पाणी तरी अश्या प्रकारचा कचरा टाकून प्रदूषित करू नका व अनेक रोगांना आमंत्रण देऊ नका.आधीच कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या वर्षी कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेऊन फक्त्त 5-6 कार्यकर्त्याच उपक्रमात सामील झाल्या. यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, सचिव सुनीता साळवे,सदस्या शहनाझ शेख, मीरा कोलते,जयश्री चांदेकर, ऐश्वर्या लाकडे, सहभागी झाल्या होत्या