भाजपा महिला मोर्चाच्या वतीने *”एक पेड माँ के नाम”* उपक्रमाला सुरुवात

57

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने *”एक पेड माँ के नाम”* उपक्रमाला सुरुवात..

 

गडचिरोली :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाला सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी मन की बात च्या 111 व्या एपिसोड मध्ये जनतेला एक वृक्ष स्वतःच्या आईच्या नावाने लावण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वामध्ये व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री वृद्धाश्रम परिसरामध्ये “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले.

जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी भाजपा महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने लावण्याचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवावे असे आवाहन केले.

 

त्याप्रसंगी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.चंदाताई कोडवते, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव रंजीताताई कोडापे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, शहर महामंत्री पल्लवीताई बारापात्रे, नीताताई वड्डेटिवार उपस्थित होत्या.