चामोर्शी तालूक्यात निराधार योजनेची 168 प्रकरणे मंजूर

138

चामोर्शी तालूक्यात निराधार योजनेची 168 प्रकरणे मंजूर

गडचिरोली,(जिमाका)दि.25 :- राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परीतक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादी यांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहचविण्याकरीता चामोर्शी तालुक्यातील महाराजस्व अभियान तथा समाधान शिबीर अंतर्गत जनजागृती करुन लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज भरुन घेण्यात येतात. वरील योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष चामोर्शीचे तहसिलदार जितेंद्र शिकतोडे, ना.तह.संगांयो, दिलीप ग. दुधबळे, क.लि. कु.डी.सी. सहारे यांचे उपस्थितीत सभा आयोजित करुन पुढील प्रमाणे अर्ज मंजूर- नामंजूर करण्यात आले.
संजय गांधी योजना समितीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेअंतर्गत एकूण 177 अर्ज प्राप्त झाले असून 168 अर्ज मंजूर करण्यात आले असून 9 अर्ज नामंजूर करण्यात आले. नमुद केल्याप्रमाणे सर्व अर्ज मंजुरीच्या कार्यवाहीकरीता तहसिलदार चामोर्शी, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती, चामोर्शी यांचे समोर ठेवण्यात आले. अर्जाची तपासणी व छाननी करण्यात आली. प्राप्त असलेली प्रकरणे आणि प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता झालेली प्रकरणे मंजूर करण्याबाबत शिफारस करण्यात आली. पात्र असलेले अर्ज योजना निहाय वरील प्रमाणे मंजुर करण्यात आले असे जितेंद्र शिकतोडे, तहसिलदार, चामोर्शी यांनी कळविले आहे.