पेनगंुडा येथे झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांस गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

14

 

पेनगंुडा येथे झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांस गडचिरोली पोलीस दलाने केले अटक

श्व् महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 10 लाख रुपयांचे बक्षीस.

 

गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. तसेच माओवाद्यांच्या येणा­या नक्षल सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या दोन माओवाद्यांस आज दिनांक 09/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केले. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 81 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना दोन संशयित व्यक्ती पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनंतर त्यंाची अधिक सखोल चौकशी केली असता, त्यांची नावे 1) रवि मुरा पल्लो (अॅक्शन टिम कमांडर), वय 33 वर्षे, रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली, 2) दोबा कोरके वड्डे (पार्टी सदस्य, भामरागड दलम), वय 31 वर्षे रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली अशी असून, या दोघांचा माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे धोडराज येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. 02/2023 कलम 302,143,147,148,149,120(ब) भादवि सह कलम 3/25 भाहका अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आली.

 

अटक माओवादी आरोपींची माहिती

 

1) नामे रवि मुरा पल्लो

 

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2016 पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन माओवाद्यांची कामे करित होता.

श्व् सन 2018 पासून अॅक्शन टिम सदस्य म्हणून काम करीत होता.

श्व् सन 2022 मध्ये अॅक्शन टिम कमांडर म्हणून बढती व आजपावेतो कार्यरत.

 

 

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

त्याचेवर आजपर्यंत एकुण 06 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 01 चकमक, 01 जाळपोळ, 03 खून व 01 ब्लास्टींग या गुन्ह्रांचा समावेश आहे.

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

 

 चकमक – 01

 

 सन 2019 मध्ये मौजा मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत 02 माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.

 

 

 जाळपोळ – 01

 

 सन 2022 मध्ये मौजा धोडराज ते इरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या 19 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

 खून – 03

 

 माहे नोव्हेंबर 2018 मध्ये मौजा इरपनार येथील निरपराध महिला नामे बेबी मडावी हिच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 सन 2022 मध्ये मौजा नेलगुंडा येथील निरपराध इसम नामे राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम नामे दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 

 इतर – 01

 

 दिनांक 22/03/2023 रोजी नेलगंुडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

 

2) नामे दोबा कोरके वड्डे

 

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2008 पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन माओवाद्याचे काम केले.

श्व् सन 2019 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत

कार्यकाळात केलेले गुन्हे

 

त्याचेवर आजपर्यंत एकुण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 05 चकमक, 07 खून व इतर 06 गुन्ह्रांचा समावेश आहे.

 

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

 

 चकमक –

 

 सन 2019 मध्ये मौजा मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत 02 माओवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.

 

 जाळपोळ –

 

 सन 2022 मध्ये मौजा धोडराज ते इरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या 19 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

 खून –

 

 सन 2022 मध्ये मौजा नेलगुंडा येथील निरपराध इसम नामे राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम नामे दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.

 

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

 

 

1) महाराष्ट्र शासनाने रवि मुरा पल्लो याच्या अटकेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

2) महाराष्ट्र शासनाने दोबा कोरके वड्डे याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.