*रेल्वे कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी सुरज हजारे व वामन राऊत यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा पहिला दिवस*

43

*रेल्वे कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी सुरज हजारे व वामन राऊत यांचा उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा पहिला दिवस*

गडचिरोली वडसा रेल्वे बांधकाम करताना रेल्वे बांधकाम कंत्राटदारामार्फत अवैधपणे मुरूम उत्खनन वडसा व आरमोरी तालुक्यातून करण्यात आले. याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी देसाईगंज व तहसील कार्यालय आरमोरी यांना याबाबत लेखी तक्रार देऊन सुद्धा यावर त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही.

रेल्वे प्रशासनामार्फत आरमोरी येथील किटाळी -चुरमुरा या गावां मधातील तलावातून अवैध रात्र दिवसा मुरूम उत्खनन करण्यात आले.तसेच ठाणेगाव, वासाळा, इंजेवारी, देऊळगाव या गावा मधून सुद्धा अवैधपणे मुरूम उत्खनन करण्यात आले. ज्या पद्धतीने गडचिरोली तालुक्यातील अवैद्य उत्खननावर संबंधित कंत्राटदारावर 235 कोटीचा दंड लावण्यात आला त्याच धर्तीवर आरमोरी व वडसा तालुक्यातील अवैद्य उत्खननाचे मोजमाप करून संबंधित जे.पी. कन्ट्रक्शन व व्ही आर एस कंपनी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार करून सुद्धा दोन्ही तालुक्यात आजपर्यंत अहवाल बनवून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

या विषयावर उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्या सोबत प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांनी आरमोरी येथील मोजमाप करून अहवाल बनवण्याचे सांगितले परंतु अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचला गेलेला नाही कारण त्यात संबंधित चौकशी पथकात असलेले नायब तहसीलदार व रेल्वे कंत्राटदार यांचे संगनमत असल्याने त्यांनी त्या अहवालाच त्यांनी त्या अहवालात काहीतरी फेरबदल केले असेल असे वाटते त्यामुळे ते अहवाल सादर करण्यास विलंब करीत आहेत. त्यात त्यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सुरज हजारे व वामन राऊत हे आज पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज याचा समोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसलेले आहेत. जेव्हा पर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तेव्हापर्यंत सदर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील.