*काॕप्लेक्स येथील तलाठी कार्यालय गडचिरोली शहरात स्थानांतरीत करा – जनकल्याण प्रतिष्ठान ची मागणी*

25

*काॕप्लेक्स येथील तलाठी कार्यालय गडचिरोली शहरात स्थानांतरीत करा – जनकल्याण प्रतिष्ठान ची मागणी*

*गडचिरोली दि.१२- काॕप्लेक्स परिसरातील तलाठी कार्यालय गडचिरोली शहरात स्थानांतरीत करावे अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे जिल्हाधिकारी गडचिरोली यांंचेकडे करण्यात आली आहे. गडचिरोली व रामपूर तुकुम अशी दोन तलाठी कार्यालये जिल्हा निर्मीती पासून गडचिरोली शहरात होती परंतु काही वर्षापुर्वी ती काॕप्लेक्स परीसरात आटीआय चौक ते जिल्हाधिकारी निवास रस्त्यावर स्थानांतरीत करण्यात आली. गडचिरोली शहरातील गोकुळनगर रामनगर लांजेडा व इतर भागातील गोरगरीब जनतेला तिथपर्यंत जाण्याची सोय नसल्यामुळे आॕटोरिक्षासाठी ३० रू जाणे व ३० रू येण्यासाठी असे ६० रू, खर्च करावे लागतात. अनेकदा तलाठी हजर नसल्यामुळे पुन्हा पुन्हा जावे लागते. गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घेऊन ही दोन्ही तलाठी कार्यालये तहसीलदार कार्यालयाजवळ किंवा राजस्व बचत भवनात स्थानांतरीत करावी अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली सचिव प्रा.अशोक लांजेवार व उपाध्यक्ष शिवराम कुमरे यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी श्री संजय दैने यांनी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांना दिले आहेत.