नागपूर नागरिक सहकारी बँकेचा ६ व्या वर्धापनदिनी *समाजमित्र सन्मान सोहळा* उत्साहात पार पडला

34

 

नागपूर नागरिक सहकारी बँकेचा ६ व्या वर्धापनदिनी *समाजमित्र सन्मान सोहळा* उत्साहात पार पडला

गडचिरोली

दि.10-7-2024

नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या गडचिरोली शाखेने आपल्या ६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून *समाजमित्र सन्मान सोहळयाचे* तसेच *कार लोन मेळाव्याचे* आयोजन केले होते. नागपूर नागरिक सहकारी बँक बँकिंग व्यवसायसोबतच आपल्या सामाजिक दायित्वचा प्रत्यय देत आली आहे. ज्याद्वारे रक्तदान शिबिर, निशुल्क नेत्र तपासणी व चष्मे वाटप इत्यादी उपक्रम राबवत आली आहे. या ६ व्या वर्धापनदिनी सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान सोहळा आयोजित केला गेला. यात श्री. सत्य साई सेवा संघटना, गडचिरोली तर्फे डॉ. श्री.चंद्रकांत लेनगुरे, श्री. भूषणजी समर्थ, श्री. सतीश आदमने, जे आध्यात्मासोबतच अनेक सेवाकार्य करीत असतात ज्यात प्रामुख्याने आठवड्यात ३ दिवस फिरता दवाखाना(मेडिकल व्हॅन सेवा), गरजूंसाठी नारायण (अन्नदान) सेवा, स्वच्छता सेवा, पर्यावरण साठी वृक्ष लागवड व संवर्धन सेवा (प्रेमतरु सेवा),इ. अनेकविध निस्वार्थ सेवा करून खऱ्या अर्थाने परमेश्वर सेवा करतात, आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे ज्यांनी आधारविश्व फाऊंडेशन ही महिलांची संघटना स्थापन करुन मोठ्या प्रमाणात महिलांचे एकत्रीकरण करुन अनेक समाजोपयोगी उपक्रम आधारविश्व फाऊंडेशन च्या माध्यमातून राबवित असतात जसे विधवांना समाजात सन्मान मिळावा म्हणून दरवर्षी मकर संक्रांतीला विधवांसोबत हळदीकुंकू चा कार्यक्रम घेणे,प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण याविषयी जनजागृती, आदिवासी नक्षलग्रस्त भागात जाऊन गरजूंना मदत, कोरोना काळात बेवारस मृतदेहाचे अंतिम संस्कार करून तसेच कोरोनाबधितांना स्व खर्चाने टिफिन सुविधा उपलब्ध करून दिली त्याच बरोबर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरनाच्या कार्यातही ते अग्रेसर आहेत. सर्वश्री देवाजी तोफा ज्यांनी समस्त आदिवासी समाजाच्या उत्थानासाठो कार्य केले आणि ग्रामसभेची ताकद सर्वांना दाखवून दिली. डॉ. हेमंत अप्पलवार ज्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम ठिकाणी सर्वप्रथम नेत्ररोग सुविधा उपलब्ध करून दिली त्याच बरोबर सुरवातीच्या काळात दुर्गम भागातही आपली सेवा दिली, डॉ. शिवनाथजी कुंभारे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि तुकारामदादांच्या प्रेरणेने रुग्णसेवेतून कित्येकदा माणुसकीचा परिचय देत आले आहेत. प्रा. सौ.सविता सादमवार यांनी पणती या गृपच्या माध्यमातून अदिवासी दुर्गम भागातून गडचिरोली येथे दवाखान्यात येणाऱ्या नवजात व मातांसाठी,शिशूसाठी कपडे उपलब्ध करून देतात तसेच इतरही सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत, श्री. संजय मेश्राम,प्रसाद पवार हे माणुसकीचा घास’ हा उपक्रम चालवतात त्यामाध्यमातून जिल्हा महिला व बालरुग्णालयात रुग्णाच्या नातेवाहिकासाठी अन्नाचे पाकीट उपलब्ध करून देतात आणि सलग ५२७ दिवस हा उपक्रम चालू आहे. श्री. तानाजी भांडेकर हे शिक्षकी पेशा सांभाळून दुर्गम भागात अनेक प्रकारची समाजकार्य करीत असतात

अशाप्रकारे सर्व सन्मानार्थीना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. देवाजी तोफा यांनी ग्रामसभेचे महत्त्व आणि अधिकार याबाबत माहिती दिली तसेच अदिवासी समाजाच्या एकजुटीतुन साध्य केलेली आर्थिक प्रगती कशी सध्या केली याचाही उल्लेख केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संजयजी भेंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व सन्मानार्थीच्या कार्याचे कौतुक केले. आणि या महान विभुतींचा सत्कार करण्यामागचा उद्देश हाच की त्यांचे समाजासाठी केलेले निस्वार्थी कार्य समाजासमोर यावे जेणेकरून प्रत्येकाला आपापल्या परीने सामाजिक ऋण फेडता आले पाहिजे असे सांगितले. तसेच नागपुर नागरिक सहकारी बँक गडचिरोली शाखेने अधिकाधिक व्यवसाय करून बँकेच्या सर्व कर्जयोजना/ठेवयोजना सर्वदूर पोचवाव्या जेणे करून समाजच्या शेवटच्या घटकाना या ग्राहकाभिमुख सेवाचा लाभ घेता येईल असे मत व्यक्त केले.

सर्व मान्यवर, ग्राहक हितचिंतकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गडचिरोलीतील अनेक मान्यवर तसेच आधारविश्व फाऊंडेशन च्या सदस्या, बँकेचे कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते