आरमोरी:- बजरंग दलाच्या युवकांनी दिले गायीला जीवनदान

20

आरमोरी:- बजरंग दलाच्या युवकांनी दिले गायीला जीवनदान ….

आज दीं 13/7/2024 ला आरमोरी येथील दत्त मंदिर चौकात रहदारी चालू असताना गायीला धडक दिली. वेदनेने गाय तडफडत होती. ही दर्घटना बजरंग दलाच्या युवकांना माहीत होताच आरमोरीचे प्रखंड संयोजक अमन गाहिरवार यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाचे युवक वेळीच एकत्र आले व गायीला उपचारासाठी पशू वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. वैद्यकीय उपचार चालू आहे . नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये धाऊन येणाऱ्या बजरंग दलाच्या युवकांचे जनतेमध्ये प्रशंसा होत आहे.या प्रसंगी बजरंग दल सह संयोजक राजू जराते, शुभम इंकणे, महेश सातव, विवेक खापरे, पीयूष बांगरे, कुणाल भरणे, माणिक भोयर ,शंकर बोरकर व इतर युवक उपस्थित होते.