ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांसाठी विशेष सूचना

130

ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांसाठी विशेष सूचना

गडचिरोली,(जिमाका)दि.26 : – राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला होता. गडचिरोली जिल्हयातील काही ग्रामपंचायतींचा यात समावेश होता व त्यानुसार माहे एप्रिल, 2020 व त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्था / ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले जाती दावा पडताळणीचे मॅन्युअली अर्ज माहे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये या समितीकडे सादर केलेले होते.

तसेच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होवू नये म्हणून सदर निवडणुक कार्यक्रम स्थगीत करण्यात आला. सदरचे अर्ज परिपूर्ण नसल्यामुळे समितीद्वारे ते अर्ज नस्तीबध्द केलेले आहेत. मात्र माहे डिसेंबर 2020 मध्ये निवडणुक आयोगाने सुधारीत निवडणुक कार्यक्रमानुसार माहे जानेवारी 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी माहे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करताना समितीकडून देण्यात आलेली पावती टोकन निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत संलग्न करण्यात आली. तथापि, समितीने त्यांचे अपूर्ण ऑफलाईन अर्ज नस्तीबध्द केल्यानुसार व दि.01.08.2020 पासून जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियाही पुर्णत: ऑनलाईन झालेली असून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणेची प्रक्रिया देखिल पुर्णत: ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुक प्रयोजनार्थ जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने जे उमेदवार राखीव संवर्गातून अनुसूचित जाती व नामाप्र म्हणून विजयी झालेले आहेत अशांनी ऑनलाईन अर्ज नव्याने भरून सादर करणे आवश्यक राहील.
तसेच माहे डिसेंबर 2020 मध्ये निवडणुक आयोगाने सुधारीत निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार माहे डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर निवडणुक लढविलेल्या. काही उमेदवारांनी केवळ ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत मात्र ऑनलाईन भरलेला अर्ज व सोबतचे आवश्यक कागदपत्रे या समितीकडे अदयाप पर्यंत सादर केलेले नाहीत.
त्यामुळे निवडुन आलेल्या ज्या मागासवर्गीय उमेदवारांनी मॅन्युअली अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी या ऑनलाईन प्रक्रियेनुसार अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व मुळ दस्तावेज स्कॅन करून अपलोड करणे व तदनंतर ऑनलाईन फी भरून ऑनलाईन भरलेला अर्ज, ऑनलाईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मुळ दस्तावेज व त्याच्या छायांकीत प्रतीसह समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहीत मुदतीत दि.15.03.2021 पर्यंत अर्ज दाखल करावे.
आपण विहीत मुदतीत संपर्क न साधल्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास आपण स्वत: वैयक्तीकरित्या जबाबदार राहाल, समिती त्यासाठी जबाबदार राहाणार नाही, नोंद घ्यावी, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोलीचे राजेश पांडे यांनी कळविले आहे.