गडचिरोली जिल्हयात कार्यकाळ पुर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकारी यांचा निरोप समारंभ पार पडला

14

 

गडचिरोली जिल्हयात कार्यकाळ पुर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकारी यांचा निरोप समारंभ पार पडला

 

श्व् कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफीसर ऑफ द इयर -2023” चा वार्षीक सन्मान सोहळा संपन्न

श्व् उत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणुन पेंढरीची निवड

श्व् प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले पोलीस स्टेशन मुलचेरा

 

 

गडचिरोली जिल्ह्रात आव्हानात्मक व खडतर सेवा पुर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकारी यांची इतर जिल्ह्रामध्ये बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्या­या अधिकारी/अंमलदार यांचेकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द मंथ” हा उपक्रम दरमहा राबविण्यात येतो. याच माध्यमातून माहे जानेवारी 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधीत पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर अधिकारी/अंमलदार यांनी वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मुल्यमापन करुन त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व्हावे यासाठी “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर वार्षिक सन्मान सोहळा” आज दि. 13/07/2024 रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडला.

गडचिरोली जिल्ह्रामध्ये विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच शाखेमध्ये कार्यरत असलेले 10 पोलीस निरीक्षक, 05 सहा. पोलीस निरीक्षक व 32 पोलीस उपनिरीक्षक यांची बदली झालेली आहे. याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमप्रसंगी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांनी आपल्या मनोगतात गडचिरोली जिल्ह्रामध्ये काम करीत असतांना आलेले अनुभव कथन केले. तसेच गडचिरोली सारख्या माओवाद प्रभावीत जिल्ह्रात कशाप्रकारे आव्हानांना सामोरे जावे लागते व याठिकाणी केलेल्या खडतर कामाचा अनुभव नक्कीच भावी वाटचालीसाठी उपयोगी पडेल व गडचिरोली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शेवटी अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, याठिकाणी आपण बजावलेल्या उत्कृष्ठ कामगिरीकरीता मी आपले अभिनंदन करतो व भविष्यात देखिल आपण अशीच कामगिरी करुन महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचवाल अशी माझी अपेक्षा आहे.

 

यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन राबविण्यात येणा­या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरीता पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील पोलीस दादालोरा खिडकिची टीम उत्स्फुर्तपणे काम करीत असते. सन 2023 या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणा­या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व उपविभागीय स्तरावरील खालील अधिकारी/अंमलदार यांना उत्कृष्ट व विशेष कामगिरीसाठी “कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर – 2023” च्या माध्यमातून गौरविण्यात आलेले आहे. उत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणुन उपविभाग पेंढरीची निवड करण्यात आली असून सदरचा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी श्री. जगदीश पांडे यांना 10,000/- रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक पोलीस स्टेशन मुलचेरा, द्वितीय क्रमांक पोस्टे सिरोंचा, तृतीय क्रमांक पोस्टे पुराडा यांनी पटकाविला असून प्रभारी अधिकारी यांना अनुक्रमे 10,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, 8,000/- रु. रोख व प्रशस्तीप्रत्र, 6,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पोस्टे कोटगुल, पोस्टे भामरागड, पोमकें मालेवाडा, उप-पोस्टे जिमलगट्टा व पोस्टे मन्नेराजाराम यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करीता पोमकें ताडगाव यांना 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करिता पोस्टे मुरुमगाव यांना 3,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, तसेच उत्कृष्ट कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता पोमकें बेडगाव यांना 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता उप-पोस्टे दामरंचा यांना 3,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र सोबतच उत्कृष्ट कामगिरी (शासकिय योजना) करीता उप-पोस्टे राजाराम (खां.) 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र, विशेष कामगिरी (शासकिय योजना) करिता पोमकें घोट यांना 3,000/- रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट नाविण्यपूर्ण योजनेकरीता पोलीस स्टेशन कोटगुल यांना 5,000 रु. रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

माहे जानेवारी ते डिसेंबर 2023 या संपूर्ण वर्षात एकुण 2,46,362 लोकांपर्यंत विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात गडचिरोली पोलीस दल यशस्वी झाले आहे. प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र 7612, प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना 40126, विविध प्रकारचे दाखले 188672, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा 183, रोजगार व व्होकेशनल ट्रेनिंग 1766, प्रोजेक्ट कृषी समृद्धी अंतर्गत 6549, प्रोजेक्ट शक्ती 580 व इतर उपक्रम 561 यांचा समावेश आहे.

 

 

सदर संपूर्ण कार्यक्रम हा श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), व जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच सदर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी/अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

।।।।।।।।।।।।।