गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023  (प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी संपन्न

11

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023

(प्रत्यक्ष भरती -2024) ची मैदानी चाचणी संपन्न

 

 

 

गडचिरोली पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 10 जागांसाठी तसेच गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) 912 जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर दोन्ही भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणी ही दिनांक 19/06/2024 सुरु होऊन आज दिनांक 13/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदान येथे संपन्न झालेली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली चालक पोलीस शिपाईच्या 10 पदाकरिता 2258 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यापैकी 1561 पुरुष व 267 महिला उमेदवार शारिरीक चाचणी करीता हजर आले व त्यापैकी 1363 पुरुष व 176 महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. यासोबतच सदर उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष पार पडली. तसेच पोलीस शिपाईच्या 912 पदाकरिता एकुण 24570 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 13342 पुरुष उमेदवार व 6400 महिला उमेदवार हजर आले व त्यापैकी 11826 पुरुष व 5308 महिला उमेदवार यांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.

 

सदर पदभरती प्रक्रिया ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात आली असून यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरीक मोजणीकरीता पीएसटी (PST) Digital Physical Standard Test तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आले. तसेच उमेदवारांची 1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष व महिला) च्या चाचणी करीता (RFID) Based Technology चा वापर करण्यात आले. यासोबतच गोळा फेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात आले. यासोबतच उमेदवारांना मैदानी चाचणी दरम्यान काही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार होण्याकरीता मैदानातचं रुग्णालयाची सोय करण्यात आली. तसेच इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण मा. पोलीस अधीक्षक यांचे समक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले. यासोबतच आज रोजी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व पत्रकार बंधुना बोलावून त्यांना पोलीस भरती मैदानी शारिरीक चाचणीमध्ये वापरण्यात आलेल्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

तसेच मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणतालीकेची यादी व लेखीपरिक्षेकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी तसेच लेखीपरिक्षेचा दिनांक लवकरच गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे असे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी सांगितले आहे.

।।।।।।।।।।।।।।।।।