*लोकसभेत झालेल्या पराभवाला खचुन न जाता भाजपाचे संघटनात्मक काम करत येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या जोमात तयारीला लागा… भाजपा संघटनेच्या बैठकीत मा.खा.श्री.अशोक जी नेते यांचे प्रतिपादन…..*

30

*लोकसभेत झालेल्या पराभवाला खचुन न जाता भाजपाचे संघटनात्मक काम करत येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या जोमात तयारीला लागा… भाजपा संघटनेच्या बैठकीत मा.खा.श्री.अशोक जी नेते यांचे प्रतिपादन…..*

—————————————-

*भामरागड़ व एटापल्ली येथे तालुका भाजपाची संघटनात्मक बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न..*

 

दि.१४ जुलै २०२४

गडचिरोली जिल्हातील ता.भामरागड व एटापल्ली येथे आज दि.१४ जुलै २०२४ रोज रविवारी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह भाजपा संघटनेची बैठक माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या नेतृत्वातील अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

 

या संघटनात्मक बैठकीत मंथन करतांना नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या या लोकसभेच्या निवडणूकी दरम्यान विरोधकांनी संविधान बदलविणार तसेच महिलांच्या खात्यात महिन्याला खटाखट साडे आठ हजार टाकु अशा पद्धतीचा निवडणूकित समोर येऊन खोटा नाटा अपप्रचार करुन मतदारांची दिशाभूल करण्यात आले.देशाचे लाडके कनखर नेतृत्व वान, कर्तुत्व वान लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र जी मोदी यांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे करुन देशाला आर्थिक विकासासह पुढे नेण्याचे काम करत विकासाची दुष्टी ठेऊन देशाला प्रगती पथावर नेण्याचा काम केल.दहा वर्षात दिन दलीत शोषित पिडीत वंचित अशा सामान्य लोकापर्यंत अनेक योजना अमलात आणुन कार्यान्वित केले.परंतू अशा विरोधकांच्या अपप्रचारामुळे केंद्रात विकासाची कामे होऊन सुद्धा लोकसभा निवडणुकीत अपयश आले.लोकसभा निवडणूकीच्या निकालावरून कार्यकर्त्यानी व पदाधिऱ्यांनी निराश न होता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जोमाने कामाला लागावे असे प्रतिपादन माजी खासदार अशोकजी नेते यांनी भाजपाच्या संघटनात्मक बैठकी दरम्यान केले.तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची योजना आहे. महिलांना सशक्त व स्वतः च्या पायावर व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा यासाठी योजना अमलात आणली.याचा लाभ महिलांनी आपला फार्म भरून घ्यावा. व लाभ घ्यावा मि सुद्धा माझ्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली व चामोर्शी येथे कार्यालयात महिलांन साठी धावफड व त्रास होऊ नये याकरिता फॉर्म भरण्याचा कार्यालय खोलून शुभारंभ केला आहे. यासाठी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरून महिला भगिनींना सहकार्य करून लाभ मिळवून द्यावा. व कार्यकर्त्यानी आपला बुथ मजबुत करुन भाजपा संघटनेचे काम मजबुत करावा असे आवाहन याप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते यांनी केले.

 

यावेळी मा.खा.नेते यांनी लोकसभा क्षेत्रात केलेल्या कामाचा वृतांत देत जसे गडचिरोली वडसा रेल्वे बांधणी त प्रगती पथावर काम सुरू आहे.गडचिरोली जिल्हात रेल्वे चे जाळे उभारणी, सिंचनाचे प्रश्न बँरेजेस चिचडोह, कोटगल बँरेज,सुरजागड लोह प्रकल्प, मेडिकल काँलेज,नँशनल हायवे रोड, गोंडवाना विद्यापीठ, हवाई पट्टा ची मंजूरी,असे अनेक विकास कामे लोकसभा क्षेत्रात प्रगती पथावर चालू आहेत काही कामे झालेले आहेत. माझा जरी पराभव झाला असेल तरी मी जनतेचा कौल मान्य करतो.जय पराजय होणे साहजिकच आहे.विजय हा पचवला पाहिजे आणि पराजय स्विकारला पाहिजे पराभवाला खचून न जाता पुढे ही मी जनतेच्या सेवेत कायम राहील.व सतत कामे करित राहिल.मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकारी व जनतेचे आभार मानतो. आपला सहकार्य व प्रेम सदैव असुद्या असे भामरागड व एटापल्ली भाजपाच्या संघटनात्मक बैठकी ला कार्यकर्त्याशी संवाद साधतांना मा.खा.अशोक नेते बोलत होते.

 

यावेळी बैठकीला प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव जी कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाश जी गेडाम,किसान मोर्चा चे प्रदेश चिटणीस रमेशजी भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,यांनी सुद्धा भाजपा संघटनेबद्दल विस्तृत सविस्तर मार्गदर्शन केले.

 

*या प्रसंगी बैठकीला प्रामुख्याने भामरागड तील पदाधिकारी..*

भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम,शहराध्यक्ष सम्राट मलीक,नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाकाय,महामंत्री तपेश हलदार, अनंत बिशवास,

*तसेच*

*या प्रसंगी बैठकीला प्रामुख्याने एटापल्लीतील पदाधिकारी..*

भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम,शहराध्यक्ष निखिल गादेवार,माजी तालुकाध्यक्ष अशोक पुल्लुरवार,ता.महामंत्री मोहन नामेवार,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संपत पैदाकुलवार, आदिवासी आघाडी चे तालुकाध्यक्ष संभा जेट्टी,महीला आघाडी तालुकाध्यक्षा सुनिता चांदेकर,जिल्हा सचिव बाबुराव गुंफावार,शक्तीकेंद्र प्रमुख साईनाथ वेलादी,ता.उपाध्यक्ष सागर मंडल,तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.