*आदिवासी उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण* *२९ जुलैपर्यंत करा अर्ज*

33

*आदिवासी उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण*

*२९ जुलैपर्यंत करा अर्ज*

 

गडचिरोली,दि.16(जिमाका): कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एम.पी.एस.सी. तसेच जिल्हा निवड समीतीच्या विविध पद भरती आणि आयबीपीएस व शॉर्ट सर्व्हीस कमीशनच्या परीक्षाबाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान दरमहा एक हजार रुपये विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज दि. 29 जुलै 2024 पर्यत कौशल्य विकास कार्यालयात सादर करावेत. तदनंतर मुलाखत दि.30 जुलै रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थिलत राहावे अधिक माहीतीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

0000