निवासी अपंग विद्यालय लांझेडा, गडचिरोली येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयतर्फे खाऊवाटप

27

 

निवासी अपंग विद्यालय लांझेडा, गडचिरोली येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयतर्फे खाऊवाटप

 

गडचिरोली दि. १६ जुलै २०२४

गडचिरोली येथील प्रगती बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित निवासी अपंग विद्यालय लांझेडा, गडचिरोली येथे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासाच्या वतीने दिनांक १६ जुलै २०२४

रोजी खाऊवाटप करण्यात आले. यावेळी निवासी अपंग विद्यालयाचे , शिक्षक श्री. जोशी , श्री. हर्षे तसेच काळजीवाहक श्री. चापे , श्री. देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे विविध समाजोपयोगी व विविध समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

न्यासातर्फे गरजूना कपडे वाटप, खाऊवाटप, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे ,ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, आरोग्यविषयक तपासणी असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून या खाऊवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यासाच्या वतीने सौ. प्रगती मामिडवार, सौ. लता समर्थ सहभागी झाल्या होत्या . या कार्यक्रमाचा लाभ १५ विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना आनंद झाला.

 

आपली नम्र

सौ. प्रगती मामिडवार

९६५७९९१०८७