*विविध मुद्यानी गाजली अहेरीतील आढावा बैठक* रस्ते, वीज, पाणी, पट्टे,आरोग्य विषयावर मंत्र्यांचे भर

25

*विविध मुद्यानी गाजली अहेरीतील आढावा बैठक*

रस्ते, वीज, पाणी, पट्टे,आरोग्य विषयावर मंत्र्यांचे भर

*ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले!*

 

*अहेरी:-* अहेरी तहसील कार्यालयात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवार 18 जुलै रोजी आढावा बैठक घेतले, सदरची आढावा बैठक विविध मुद्याणी गाजली.

बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम हे होते, तर मंचावर प्रामुख्याने सहाय्यक जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपमुख्याधिकारी महिला व बालकल्याण राजेंद्र भुयार, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नानाजी दाते, ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम, रा. काँ.चे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वांसेकर , अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन राव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यतः अहेरी तालुक्यातील व शहरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण , वनजमिनीवरील पट्टे या व अन्य विविध विषयांवर मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडनी करून चांगलेच धारेवर धरले व खडसावले.

अहेरी शहरातील अहेरी ते आलापल्ली रस्त्यावरील पोलीस उपमुख्यालय प्राणहिता ते मुख्य चौकातील रस्ता मागील सहा महिन्यापासून दिरंगाई होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी आढावा बैठकीत सदरचे विषय वेधताच मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी व उपविभागीय अभियंता यांना खडे बोल सूनावले आणि सबंधित कंत्राटदार यांच्यावर कारवाई व प्रसंगी कंत्राटदाराचे नोंदणी काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट)टाकण्याचे सूचना केले.

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी वीज, रस्ते, बसेस, वन जमिनीचे पट्टे, कृषी, शिक्षण, सिंचन, आरोग्य, पोषण आहार आदी विषयाकडे अधिक भर घालून शासनाचे सोयी सुविधा नागरिकांना सुलभतेने पुरविण्यात यावे, कामात उत्तम व दर्जेदारपना असावे त्यात दिरंगाई व दुर्लक्षपणा झाल्यास व कामचुकार झाल्यास सबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर पाऊले उचलले जाईल असे संकेत दिले.

सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी माता भगिनींचे अर्ज ताबडतोब व अचूक भरून शासनाचे या व अन्य विविध योजनेचे लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

आढावा बैठकीत विविध विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, अरुण मुक्कावार, श्रीकांत मद्दीवार, इरफान पठाण, नगर सेवक श्रीनिवास चटारे, अमोल मुक्कावार, शैलेश पटवर्धन, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, स्वप्नील श्रीरामवार, महेश बाक्केवार, बाबुराव तोरेम, राहुल दुर्गे, रमेश कस्तूरवार आदी व असंख्य नागरिक उपस्थित होते.

 

*मंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण व शेतकऱ्यांचे सत्कार!*

तहसील कार्यालय परिसरात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते विविध फळे व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच वडलापेठ इथे स्थापित होत असलेल्या ओद्योगिक कारखान्याला परिसराला उद्योग व ओद्योगीक चालना मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी जागा कंपनीला उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सत्कार मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.