*शासन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे हाल-बेहाल…???? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जनतेची समस्या लवकरच शिवसेना स्टाईल ने मार्गी लावणार

24

*शासन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे हाल-बेहाल…???? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जनतेची समस्या लवकरच शिवसेना स्टाईल ने मार्गी लावणार….!!!!*

 

*गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा जोर वाढत चाललेला आहे या सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील बऱ्याच तालुक्यांचा संपर्क अनेक गावांसोबत तुटलेला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे कंत्राटदारांनी जे पूल बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले असता हे संपूर्ण काम पावसाळ्याचे अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे होते परंतु केंद्र-राज्य सरकार आणि कंत्राटदार यांच्या दिरंगाईमुळे हे संपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि या संपूर्ण गोष्टीचा नाहक त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. या संदर्भात अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख श्री. रियाज भाई शेख यांनी पाठपुरावा करून सुद्धा शासन प्रशासन गप्प का बसलेले आहेत…??? याच उत्तर शासन प्रशासनाने द्यावे…???*

 

१)अहेरी-आलापल्ली-प्राणहिता-देवलमारी या मार्गाचे काम पूर्णत्वास यायला पाहिजे होते परंतु कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि दुर्लक्ष ते मुळे हे काम अर्धवट राहिल्याने प्रवाशांना ये-जा करण्याकरिता जीवघेणा प्रवास या मार्गाने करावा लागतो आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आणि याचा तीव्र विरोध करीत जिल्हाप्रमुखांनी शासनाकडे मागणी केलेली आहे.

 

२)आलापल्ली-सिरोंचा महामार्ग सुद्धा गड्डामय-चिखलमय झालेला आहे निष्कृष्ट दर्जेचा काम सुरू आहे जनतेचे हाल-बेहाल होत आहे, विद्यार्थ्यांना शाळेत कॉलेज जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे अशी परिस्थिती अहेरी विधानसभा क्षेत्रात असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढून राहिले, रस्त्यात गड्डा आहे की गड्ड्यात रस्ता आहे हेच कळेनासे झाले.

 

३) भामरागड येथे कंत्राटदाराच्या डीसाळ नियोजनामुळे गरोदर महिलेला, पूल नसल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने नाला पार करावा लागतो आहे, जीवघेणा प्रवास त्या ठिकाणी करावा लागत आहे ही बाब अतिशय निंदनीय आहे.

 

४)आलापल्ली-मुलचेरा मार्गावर सुद्धा मोठ मोठाले गड्डे पडलेले आहे. मोठ-मोठे नेत्यांचे प्रवास हवाई वाहनाने होते त्यामुळे वास्तविकता अशी आहे की जोपर्यंत रस्त्यावर यांच्या गाड्या फिरत नाही तोपर्यंत गंभीर परिस्थिती या नेत्यांना समजणार नाही.

 

*एकीकडे सरकार गडचिरोली जिल्ह्यात विकासाचे गाणे गात असताना ह्याच गडचिरोली जिल्ह्यातील अति संवेदनशील आदिवासीबहुल भागात कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेची दिशाभूल करत आहेत. अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे व ज्या ठिकाणी रस्ते किंवा पूल वाहून गेलेले आहेत अशा ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावे. केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेला सुख-सुविधा पोहोचवण्यास अपयश ठरलेले आहे. पावसाळ्यानंतर ही कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. रियाज भाई शेख यांनी शासन प्रशासनाला दिला आहे.*

 

*जय महाराष्ट्र…!!!!🙏🙏🙏*

 

*आपलाच:-*

 

*श्री रियाज भाई शेख*

*शिवसेना जिल्हाप्रमुख*

*अहेरी विधानसभा*