भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली

36

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली.

जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे सन 2007 पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. माओवादयांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे 07 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य माओवादयांचा हिंसेचा खोटा आणि विनाशकारी मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते.

काल दि. 25 जुलै 2024 रोजी ते दिनांक 26 जुलै 2024 चे मध्यरात्री माओवादयांनी जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली. सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे