जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीवर दोन अशासकीय  महिला सदस्य नियुक्ती करीता अर्ज आमंत्रित

26

जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीवर दोन अशासकीय

महिला सदस्य नियुक्ती करीता अर्ज आमंत्रित

 

गडचिरोली,दि.26(जिमाका):महिला व बाल विकास विभागाकडुन महिलांकरीता सामाजिक कायदे व महिला धोरणाच्या अंमलबजावणीकरीता तसेच महिलांच्या विकासाकरीता विविध योजना राबविण्याच्या/अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अनेक समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सदर समित्यांचे एकत्रीकरण करुन शासन निर्णयान्वये संपुर्ण जिल्हा स्तरावर संपुर्ण अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हाधिकारी, जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

सामाजिक क्षेत्रात महिलासाठी कार्य करणाऱ्या, महिला धोरण, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील या महिला सामाजिक कार्यकर्तीकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदरचे प्रस्ताव दिनांक 06 ऑगस्ट 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली शासकीय संकुल बॅरेक क्रमांक 1, खोली क्रं.25, 26 गडचिरोली येथे सादर करावेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000