*अहेरी आलापल्ली रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुझवा – ना.धर्मराव बाबांचे सा.बा. विभागाला कडक निर्देश* 

39

*अहेरी आलापल्ली रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुझवा – ना.धर्मराव बाबांचे सा.बा. विभागाला कडक निर्देश*

 

अहेरी – मा.ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी प्रणाहिता कॅम्प दरम्यान रस्त्यावर पडेलेल्या खड्ड्याना तात्काळ बुझवून रस्ता राहादारी योग्य करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कडक सूचना दिल्या आहेत,लगेच काम चालू करा अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सूचना दिल्या आहेत.त्या संदर्भाने उपाभियंता पारेलिवार, क.अभियंता आडेपू तसेच राष्ट्रवादी कांग्रेस चे युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम, अरुण मुक्कावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, विधानसभा सभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, बाबुराव तोरेम, नगर सेवक श्रीनिवास चटारे, संदीप पूजलवार, मखमूरभाई, रहमान शेख, आणि बरेच राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते यांनी उपाभियंता पारेलीवर यांचे सोबत अहेरी रस्त्याची पाहणी केली व दोन दिवसात काम पूर्ण करून देण्याबाबत सांगण्यात आले असून, लगेच कामाला सुरवात करण्यात येईल असे पारेलीवार यांनी हमी दिली.

सदर कामासाठी मा.ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी 6.00 कोटीची भरघोस निधी मंजूर करून दिले असून आलापल्ली ते प्रानहितापर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले असून त्या पुढील काम पावसामुळे स्थगित असून पाऊस ओसारताच चालू करून पूर्ण करण्यात येईल असे अशी माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

ना.आत्रमांनी विधानसभा सभा क्षेत्रातील अनेक रस्त्यांना मंजुरी मिळवून दिले असून त्यापैकी अहेरी महागाव, अहेरी देवलमारी, अहेरी खमनचेरू, प्राणहिता कॅम्प ते अहेरी हे अहेरी लागतचे सर्व रस्ते बांधकाम जवळपास पूर्ण झालेले असून ना.आत्रामांच्या प्रयत्नाने अनेक रस्त्यांचे प्रश्न सुटले आहेत.