प्रचंड पावसातही 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा

33

वार्

प्रचंड पावसातही 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा

 

 

 महिला उमेदवारांची 100 टक्के उपस्थिती.

 पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढुन त्यांना परिक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले.

 एकुण 6711 उमेदवारांमधून 6657 उमेदवारांनी दिली लेखी परिक्षा.

 

 

 

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 प्रत्यक्ष भरती 2024 च्या 912 जागांसाठी आज दिनांक 28/07/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलातर्फे लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलामार्फत पार पाडण्यात आली.

गडचिरोली पोलीस दलातर्फे 912 पोलीस शिपाई पदांसाठीची मैदानी चाचणी ही दिनांक 21/06/2024 ते 13/07/2024 रोजी पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राबविण्यात आलेली होती. सदर मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांसाठी लेखी परीक्षा ही आज दिनांक 28/07/2024 रोजीचे सकाळी 08.00 वा. आयोजीत करण्यात आलेली होती. यामध्ये पहिला पेपर सामान्य अध्ययन या विषयाचा सकाळी 10.30 ते 12.00 या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी 13.30 ते 15.00 वा. दरम्यान घेण्यात आला. सदरची लेखी परीक्षा ही गडचिरोली शहरातील 1) महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली, 2) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड गडचिरोली (महिला महाविद्यालय जवळ), 3) प्लॅटिनम ज्युबली हायस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली, 4) आदिवासी इंग्लीश मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली, 5) कारमेल हायस्कुल, धानोरा रोड गडचिरोली, 6) स्कुल ऑॅफ स्कॉलर, धानोरा रोड गडचिरोली, 7) शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुलनगर गडचिरोली, 8) शिवाजी इंग्लीश अॅकॅडमी स्कुल, गोकुलनगर गडचिरोली, 9) शासकिय कृषी महाविदयालय, आयटिआय चौक गडचिरोली, 10) शासकिय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली, 11) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली, अशा एकुण 11 केंद्रावर घेण्यात आली. सर्व 11 परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. बंदोबस्ताकरीता 800 चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. सदर लेखी परिक्षेसाठी पात्र एकुण 6711 उमेदवारांपैकी 6657 पुरुष व महिला उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली. सदर लेखी परिक्षेपासुन कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्राभरात पुरपरिस्थिती निर्माण झालेली असतांना सुद्धा पुरपरिस्थितीमुळे संपर्काबाहेर असलेल्या भागातील 26 उमेदवारांना जिल्हा प्रशासन व एसडीआरएफच्या मदतीने बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले व त्यांना परिक्षा केंद्रांवर पोहचविण्यात आले. त्यामुळे लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांपैकी 100 टक्के महिलांसह 99 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावली. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. तसेच पेपर क्र.01 व पेपर क्र.02 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची व पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली होती.

सदर लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश, यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

।।।।।।।।।।।।।।।