*तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पहिल्याच भेटीत थांबवली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दानाच्या नावाने होणारी लूट..*

40

*तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पहिल्याच भेटीत थांबवली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दानाच्या नावाने होणारी लूट..*

 

 

गडचिरोली,ता.२९: गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी रुग्णालये सुरु केली आहेत. परंतु गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात रुग्णांकडून जबरदस्तीने दानपेटीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार लक्षात येताच तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन हा प्रकार थांबविला.

राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या प्रयत्नाने गडचिरोली येथे शासकीय महिला व बाल रुग्णालय सुरु करण्यात आले. गोरगरीब महिला आणि बालकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी, हा त्यामागचा हेतू होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील एक अधिपरिचारिका रुग्णांना दानपेटीत पैसे टाकण्यासाठी दबाव टाकत होती. यासंदर्भात अनेक जणांनी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांना माहिती दिली. एकापेक्षा अनेक तक्रारी आल्यानंतर आज सकाळी तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट महिला व बाल रुग्णालयावर धडक दिली. बघतात तर काय? तेथे रुग्णांना दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रकार सुरु दिसला. लागलीच तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी संबंधित अधिपरिचारिकेला धारेवर धरुन गोरगरीब महिलांची लूट थांबविण्याची तंबी दिली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा करुन पैसे उकळण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यावर यापुढे दानपेटीत पैसे टाकण्याची जबरदस्ती करणार नाही, असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. यामुळे शेकडो गोरगरीब नागरिकांना तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या एका भेटीने दिलासा मिळाला.

 

……………….