लाक्षणीय धरणे आंदोलन याला डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट

31

लाक्षणीय धरणे आंदोलन याला डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट.

 

दिनांक २९ जुलै २०२४

महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे लाक्षणीय धरणे आंदोलन 29 जुलै व 30 जुलै ला करत आहेत.

त्याकरिता डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी विनानुदानित शिक्षकाची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यांच्या प्रमुख मागण्या १.वाढीव टप्प्याच्या शासन आदिल त्वरित निर्गमित करावा. २. त्रुटी पूर्तता केलेल्या व अघोषित शाळांना अनुदान मिळावे ३.15 मार्च 2024 रोजी च्या संच मान्यतेचा आदेश रद्द करावा. ४.जीआर मधील प्रचलित नियमानुसार अनुदानाचा उल्लेख करावा ५. शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी ६.अंशतः अनुदानित शाळांना जुनी पेन्शन सह सर्व लाभ द्यावे. या प्रमुख मागण्या आहेत.

आंदोलनाला भेट देतेवेळी डॉक्टर मिलिंद नरोटे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी गडचिरोली तथा जिल्हा प्रभारी भाजप आदिवासी आघाडी, अनिल तिळके जिल्हाध्यक्ष भायुमो, धनंजय देवकर, आशिष रोहनकर, अनिकेत विश्रोजवार पंकज सोमनकर, नागेश मंगरे, तुषार चुधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.