*आजपासून महसूल सप्ताह* *विविध कार्यक्रमांचे आयोजन*

34

*आजपासून महसूल सप्ताह*

*विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 

 

गडचिरोली, दि. 31:- महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सात दिवसात महसूल विभागामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हेल्पलाईन/मदत कक्षाद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी, नागरिकांना मार्गदर्शन व शंकांचे निरासन करून त्यांची कामे पूर्ण करण्याकरिता आवश्यक व्यवस्था/कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’, 2 ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, 3 ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’, 4 ऑगस्ट रोजी ‘स्वच्छ सुंदर माझं कार्यालय’ ही विशेष मोहीम, 5 ऑगस्ट रोजी संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रम, 6 ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा’ तर 7 ऑगस्ट रोजी ‘महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येवून महसूल सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.

000