*गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महसुल विभागाचे मोठे योगदान : अप्पर जिल्हाधिकारी*

38

 

*गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात महसुल विभागाचे मोठे योगदान : अप्पर जिल्हाधिकारी*

गडचिरोली : गावपातळीवरील कोतवालापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत महसूल विभाग रात्रंदिवस जनतेच्या सेवेत सजग असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतची नोंद ठेवणारा, आपत्कालीन स्थितीत धावून येणारा, महसूल विभाग जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य योगदान देत आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मा. विवेक घोडके यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये दि. 01 ऑगस्ट, 2024 रोजी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचे जयंती निमीत्य त्यांचे प्रतिमेस पुष्प माल्यार्पन व दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सेवेच्या भावनेने आपले कर्तव्य अचुक पार पाडल्यास आपल्या विभागाची प्रतिमा सुधारण्यास मदत होत असे प्रतिपादन अध्यक्षिय भाषणामध्ये करुन, महसूल पंधरवडाला सुरुवात करण्यात आली. उपपोलिस अधीक्षक विजय चव्हाण हे सदर कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते अतिदुर्गम व संवेदनशिल भागामध्ये जाऊन महसुल सर्व कोतवाला पासुन ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत आपली जबाबदारी अचुक पार पाडत असता असे मनोगत व्यक्त केलेत, सदर कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रसेनजीत प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी आघव पाटील, उप विभागीय अधिकारी, कुरखेडा विवेक साळुंके, नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, स्वीय सहाय्यक प्रवीन गुज्जनवार, नायब तहसिलदार, अमोल गव्हारे, संगिता धकाते, दिपक गुट्टे, वनिशाम येरमे, ज्ञानेवश्वर ठाकरे, ईश्वर राऊत, ओसिन मडकाम व जिल्हा सरंक्षण अधिकारी काळे र्मॅडम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तवीक निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले व दि. 01 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट पर्यंत महसुल पंधरवडाचे शुभारंभ करीत उपस्थितांना सविस्त माहिती दिली. त्यामध्ये दि. 01 ऑगष्टला महसुल दिन साजरा करुन व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देणे, २ ऑगष्टला मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, ३ ऑगस्टला मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, ४ ऑगष्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 05 आगष्टला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, 06 ऑगष्टला शेती, पाऊस आणि दाखले, 07 ऑगष्टला युवा संवाद, 08 ऑगष्टला महसुल जनसंवाद, 09 ऑगष्टला महसुल ई-प्रणाली, 10 ऑगष्टला सैनिक हो तुम्हच्यासाठी, 11 ऑगष्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 12 ऑगष्टला एक हात मदतीचा-दिव्यांगाच्या कल्याणाचा, 13 ऑगष्टला महसुल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगष्टला महसुल पंधरवडा वार्तालाप, 15 ऑगष्टला महसुल संवर्गातील कार्यरत / सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद तसेच उत्कृष्ठ अधिकारी/कर्मचारी पुरस्कार वितरण व महसुल पंधरवडा सांगता समारभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे बोलत होते.

महसुल दिनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विस्तृत माहिती जिल्हा सरंक्षण अधिकारी काळे र्मॅडम यांनी कार्यक्रमाप्रंसगी दिली तर लोकसेवा हमी कायद्या अंतर्गत सेवा पुरविण्याबाबत व सेतु केन्द्रामार्फत पुरविण्यात येणात्या सोयी सुविधाबाबतची विस्तृत माहिती तहसिल कार्यालय, गडचिरोली मधील अव्वल कारकून गणेश गेडाम यांनी दिली. तसेच ई-फेरफार बाबतची सविस्तर माहिती नगरीचे तलाठी अरविन्द शेन्डे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन नायब तहसिलदार अमोल गव्हारे व अव्वल कारकून ज्योती तायडे यांनी सयुक्तरीत्या केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसिलदार वनिश्याम येरमे यांनी केले.

 

(सुनिल सुर्यवंशी)

निवासी उप जिल्हाधिकारी

गडचिरोली.