जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त
तिघांचा मृत्यु
यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 154 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय व 82 वर्षीय पुरुष तर मानोरा (जि.वाशिम) येथील 81 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 241 जणांमध्ये 141 पुरुष आणि 100 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील 113 रुग्ण, दिग्रस येथील 44, पुसद येथील 38, घाटंजी येथील 9, नेर येथील 7, पांढरकवडा येथील 6, दारव्हा येथील 6, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी 5, आर्णि, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
शुक्रवारी एकूण 1374 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1133 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1427 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17097 झाली आहे. 24 तासात 154 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15213 आहे. तर जिल्ह्यात एकूण 457 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 160041 नमुने पाठविले असून यापैकी 159324 प्राप्त तर 1717 अप्राप्त आहेत. तसेच 141227 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००