तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट शेतावर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद
गडचिरोली,ता.२: गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तुनश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज धानोरा तालुक्यातील धानोरा, हेटी व अन्य गावांना भेट देऊन पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी थेट शेतावर जाऊन पुरामुळे बाधित झालेल्या शेतीची माहिती जाणून घेतली. पीक परिस्थिती, खताची उपलब्धता याविषयीदेखील त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. किती क्षेत्र बाधित झाले, पंचनामे झाले काय, इत्यादी माहितीही तनुश्री आत्राम यांनी विचारली. शिवाय रोवणी करण्यासाठी आलेल्या महिलांचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी तनुश्री आत्राम यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांना प्लॉस्टिक रेनकोटचे वाटप केले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करा, अशी सूचना तलाठ्यांना करुन तनुश्री आत्राम यांनी भरपाई मिळण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी तलाठी कोडापे आणि शेतकरी उपस्थित होते.