*लोकसभा विरोधीपक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांची खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतली सदिच्छा भेट*
*गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा*
गडचिरोली :: गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा विरोधीपक्ष नेते ना. राहुल गांधी यांची दिल्ली येते भेट घेतली व लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली.
गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र महाराष्ट्रातील लोकसभा क्षेत्रापैकी अतिमागास लोकसभा क्षेत्र असून यात गडचिरोली जिल्ह्यातील (आरमोरी, गडचिरोली, अहेरी ) गोंदिया जिल्ह्यातील (आमगावं), चंद्रपूर जिल्ह्यातील (ब्रम्हपुरी, चिमूर ) विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अजूनही पायाभूत सुविधाचा विकास झाला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीना सामना करावा लागत आहे, दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तूटते, शेतीचेही अतोनात नुकसान होत असून लोकसभा क्षेत्रात कोणतेही मोठे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बेरोजगारीच्या सुद्धा समस्या वाढत असल्याची माहिती देऊन या गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरीता विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी संसदेत केली असल्याची माहिती खासदार डॉ. किरसान यांनी विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना दिली, व लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरीता केंद्र शासननाकडून विशेष आर्थिक मदत मागवून देण्यासाठी विरोधी पक्ष नेते म्हुणुन स्वतः या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पुढाकार घेण्याची विनंती खासदार डॉ. किरसान यांनी राहूल गांधी यांच्या कडे या भेटीदरम्यान केली. दरम्यान राहुल गांधी यांनी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज मिळवून देण्याकरीता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आपण पूर्ण सहकार्य करनार असल्याचे आश्वासन दिले.