आयुध निर्माणी परिसरात बिबट्याचा मृत्यू
जखमा वरून दोन बिबट्याच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे
भद्रावती – आयुध निर्माणी परिसरात बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची घटना दिनांक 26 ला उघडकीस आली बिबट्याला पडलेल्या जखमा वरून दोन बिबट्याच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
आयुध निर्माणी डीएससी परिसरात बिबट अस्वल वाघ याची नेहमीच वावर आहे याच परिसरात दिनांक 26 रोजी शुक्रवारला पाईपमध्ये बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घटना उघडकीस आली हा मृत बिबट माधी जातीचा असून त्याचे वय बारा महिने आहे. या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जखमांमुळे दोन बिबट्याच्या झुंजीत मृत पावल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला असला तरी हा घात, पात तर नाही या बाबत वन विभाग तपास करीत आहे. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षापूर्वी जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बिबटे व दोन अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना याच परिसरात घडली होती.
घटनास्थळी डॉक्टर कुंदन पोलचरवार पशुवैद्यकीय अधिकारी , डॉक्टर एकदा शेडमाके पशुधन विकास अधिकारी, एस पी राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी ,सारिका जगताप विभागीय वन अधिकारी एन व्ही हनवते क्षेत्र सहाय्यक भद्रावती कर्मचारी उपस्थित होते.