रेड रन मॅरेथान स्पर्धा संपन्न
गडचिरोली,(जिमाका)दि.05:दिनांक “1 आगस्ट 2024” रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे, जिल्हा एड्स नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय, गडचिरोली विद्यमाने रेड रिबन क्लब स्थापित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी येथे रेड रन मॅरेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सदर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ग्रामीण रुग्णालय चामोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण कुमार किलनाके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ पवन नाईक, जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर व डॉ. अभिषेक गव्हारे (CSO),नागेश मादेशी (ICTC coun.), प्राजक्ता पापनवाडे (Lab Tech.), डॉ. महेश जोशी, प्रा.गणेश दांडेकर, प्रा. महादेव सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी
बनपूरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे रीतसर उदघाटन केले. स्पर्धेमध्ये मुलीमधून प्रथम क्रमांक कु.पायल दिलीप दुधवळे हिने पटकविले तर मुलांमधून प्रथम क्रमांक कुमार सुरज गुरुदेव कुकडे यांनी पाटकविले. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झालेली आहे. ती 12 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे.
मुलांमधून आणि मुलीं मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मॅडल, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे देऊन विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी सचिन रोहणकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील रेड रिबन क्लबचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन नाईक यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थिनी कुमारी जान्हवी पेद्दीवार हिने केले.
0000