6 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या मंगलागौरी पूजना निमित्त लेख….
‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?
मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. (या वर्षी ०५.८.२०२४ या दिवसापासून ‘श्रावण’ मास चालू होत आहे. ०६.८.२०२४ या दिवशी पहिला मंगळवार आहे.) अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. सांप्रत काळात महिला पाच वर्षे हे व्रत करतात.
1 अ. देवीचे पूजन
अ १. षोडशोपचार पूजन : ज्यांना देवीची ‘षोडशोपचार’ पूजा करणे शक्य आहे, त्यांनी देवीची षोडशोपचार पूजा करावी. शेवटी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत उपचार अर्पण करावे.
अ २. पंचोपचार पूजन : ज्यांना षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही, त्यांनी देवीची ‘पंचोपचार’ (गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवणे) या क्रमाने ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत पूजा करावी. पूजा झाल्यावर श्री शिवमंगलागौरी देवीची आरती करावी. ही आरती येत नसल्यास एखाद्या देवीची आरती करावी.
2. पूजनानंतर शक्य असल्यास सुवासिनी स्त्रीला क्षमतेनुसार ‘सौभाग्यवाण’ द्यावे. शक्यतो सात्त्विक वस्तूंचे सौभाग्यवाण द्यावे.
3. पूजा झाल्यावर देवीची कथा (कहाणी) वाचावी. ज्यांना कथा वाचणे शक्य नाही, त्यांनी अखंड सौभाग्य लाभण्यासाठी देवीला प्रार्थना करावी.
4. ‘जागर’ करणे : देवीचा ‘जागर’ करण्याच्या उद्देशाने महिला रात्रभर खेळ खेळतात अथवा रात्री एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे, उदा. देवीभागवत, देवीपुराण यांचे वाचन केल्याने तो देवीचा ‘जागर’च होईल. ज्यांना काही अडचणींमुळे ग्रंथ उपलब्ध होऊ शकत नाही किंवा ज्या महिला वाचू शकत नाहीत, त्यांनी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा जप करावा अथवा आपापल्या कुलदेवतेचा नामजप करावा. यामुळेही देवीचा ‘जागर’ होऊन आपल्याला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील.’
– श्री. दामोदर वझे, संचालक, पुरोहित पाठशाळा, सनातन संस्था.
स्थानिक संपर्क- 7620831487