पीकविमा चा मागणीसाठी शेतकरी एकवटले:संयुक्त किसान मोर्चा अहेरी विधानसभा

28

पीकविमा चा मागणीसाठी शेतकरी एकवटले:संयुक्त किसान मोर्चा अहेरी विधानसभा

 

आज 8 ऑगस्ट 2024 ला देशभरात संयुक्त किसान मोर्चा चा नेतृत्वात शेतकरी मोर्चे,आंदोलने, निवेदने देण्यात आले त्याच अनुषंगाने एटापल्ली येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना तालुका कृषी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले, आणि  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा मॅनेजर ला  पीक विमा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली व पीकविमा मंजूर करण्यासाठी शेतकरी यादी देण्यात आली .तसेच  शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे मांडल्या:

 

१. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करावे आणि नुकसान भरपाई त्वरीत द्यावी.

 

२. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट (C2+50) हमीभाव देण्याचा कायदा लागू करावा.

 

३. शेतकरी आणि शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी करावी.

 

४. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/- रुपयांचे अर्थसाहाय्य तात्काळ अदा करावे.

 

५. २०२३ च्या खरीप धानउत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने त्वरीत नुकसान भरपाई अदा करावी.

 

६. वाढलेले विजेचे बिल कमी करावे, स्मार्ट मिटर योजना रद्द करावी आणि शेतीसाठी २४ तास विजपुरवठा करावा.

 

७. बी, बियाने, खते, किटकनाशके, ट्रॅक्टर व शेतीला लागणारी अन्य सामग्रीवरील जीएसटी रद्द करावी.

 

८. जबरानजोत धारकांना जमीनीचे पट्टे द्यावे. वनाधिकारी कायद्यातील गैरआदिवासींची तिन पिठ्यांची अट रद्द करावी.

 

९. ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुर व श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मासिक ५०००/- रुपये देण्याचा कायदा करावा.

 

१०. बेघर लोकांना घरांसाठी ५ लाख रुपये अर्थ सहाय्य द्यावे आणि जागा उपलब्ध करून द्यावी.

 

११. रोजगार हमीच्या काम करणाऱ्या मजुरांच्या कामाचे पैसे त्वरीत अदा करावे.

 

१२. राशन दुकानातून जीवनावश्यक सर्व वस्तूंचा पुरवठा करावा आणि राशन व्यवस्था मजबूत करावी.

 

१३. २०१३ चा भूमी अधिग्रहण व वनाधिकार कायदा २००५ ची प्रभावी अमलबजावणी करावी.

 

संयुक्त किसान मोर्चाने या मागण्यांसाठी एकत्र येऊन आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने तात्काळ योग्य निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.

 

कॉ. सचिन मोतकुरवार

संयुक्त किसान मोर्चा, गडचिरोली ,

 

सैनुजी गोटा माजी जि.प सदस्य,

 

कॉ.सुरज जककुलवार , कॉ.रमेश कवडो व अनेक शेतकरी उपस्थित होते