*अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दीन व क्रांती दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.*
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा येथे जागतिक आदिवासी दीन व क्रांती दिनाचे औचित्य साधून ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
७ ऑगस्ट ला वाचन स्पर्धा,संवाद कौशल्य,केशभूषा स्पर्धा व प्राथमिक विभाग विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक ८ ऑगस्ट ला विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,सुंदर माझे अक्षर स्पर्धा व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,दुपारच्या सत्रात प्राणायाम व व्यायामाचे फायदे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक ९ऑगस्ट ला विर बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमेक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.यशोधरा उसेंडी,प्राथमिक मुख्याध्यापक श्री.सतीश कुंटेवार,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.पत्रुजी किरंगे अधीक्षक श्री.विश्वनाथ मडावी,अधिक्षिका श्रीमती.मयुरी साहारे व गावातील असंख्य पालक वर्ग उपस्थित होता.उपस्थित गावातील आदिवासी बांधव व पालक यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्तकार करण्यात आला, विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढून बिरासा मुंडा चौकात विद्यार्थ्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आदिवासी संस्कृती व जागतिक आदिवासी दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गाव व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
*शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस २५० सौंदरिकरण रोपांची लागवड करून एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला* कार्यक्रमाचे संचलन श्री.सतीश पावर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.वाय.बी.गोंगल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक श्री.जगजीवन सेलोकर,श्री.विवेक आखाडे,सांस्कृतिक प्रमुख श्रीमती.शोभा रामटेके,श्रीमती.रंजना उंदिरवडे,श्री.एच. टी. कलसार,श्री.सुभाष मडावी,प्रयोगशाळा परिचर श्री.धनराज चुधरी,श्री.चांगदेव मशाखेत्री,श्री.मधुकर दरो यांनी सहकार्य केले.