*नगरसेवकांचे तत्पर कामकाजामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण*

21

*नगरसेवकांचे तत्पर कामकाजामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण*

 

*आरोग्याची काळजी घेऊन कुटुंब निरोगी ठेवण्यास मदत*

 

 

नगरपंचायत एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या १७ प्रभागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्रोत असून त्या मध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्धीकरणाचे काम सुरू आहेत.

मात्र स्वमालकीचे हात पंप व विहिरीत होणाऱ्या पाणी दूषित टाळण्याच्या हेतूने नगरपंचायतचे बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार यांनी स्वतः पुढाकार घेऊन सुट्टीच्या दिवशीही खाजगी विहीर व हात पंप धारक असलेल्या प्रभाग क्रमांक १० मध्ये स्वतः जाऊन घरोघरी पाणी शुद्धीकरण व्हावे या हेतूने ब्लिचिंग पावडरचे वाटप करून नागरिकांना स्वच्छ पाणी वापरण्या संदर्भात माहिती देऊन आरोग्य सृढ ठेवण्यास एक संदेश दिला व आव्हान ही केले की स्वच्छ पाण्याचा वापर केल्याने आपले कुटुंब निरोगी व सृढ राहील.याकरिता लागणारी मदत करण्यास नगरपंचायतचे बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार नेहमीच आपल्या संपर्कात आहेत असे आव्हान नागरिकांना केले.