पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री राठोडवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
[] भाजपा महिलांनी साकोलीत दिले निवेदन []
भंडारा प्रतिनिधी : सोशल मिडीया टिकटॉकस्टार पुजा चव्हाण हिची संशयायास्पद स्थितीत आत्महत्या प्रकरणात गोवले असलेले वनमंत्री संजय राठोडवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसह साकोलीत पोलीस ठाणे येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भंडारा जिल्हावतीने (२७ फेब्रु.) ला पोलीस उपनिरीक्षक श्री खोकले यांना भाजपा महिलांचे स्वाक्ष-यांसह निवेदन देण्यात आले.
सोशल मिडीया टिकटॉकस्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री पोहरादेवीत जाऊन वाचविण्याकरीता शक्तीप्रदर्शन करीत आहेत ही क्रिया थोतांड असून त्वरीत वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन पत्र भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा इंद्रायणी कापगते यांचे नेतृत्वात तालुकाध्यक्षा उषा डोंगरवार, नगराध्यक्षा धनवंता राऊत, जिल्हासचिव मंगला कापगते, शहराध्यक्षा निशा इसापुरे, नगरसेविका नालंदा टेंभुर्णे, रोहिणी मुंगुलमारे, मिना लांजेवार, शैलू बोरकर, ता.महामंत्री भिमावती पटले, शहर महामंत्री वर्षा परमार, शहराध्यक्षा शकुंतला गि-हेपुंजे, ता.उपाध्यक्षा भुमिता धकाते, शारदा लांजेवार, माहेश्वरी नेवारे, प्रिती डोंगरवार, महामंत्री कल्पना कापगते यांसह भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी येथे निवेदन देतेवेळी हजर होते.